सावंतवाडी,ता.१०: नगरोत्थान योजने अंतर्गत शहरातील पाणी पुरवठा योजना सुधारित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत गरड व झिरंग भागात उंच सलोह टाक्यांचे बांधकाम करणे, पाळणेकोंड धरणावर जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम करणे, पाळणेकोंड धरणावर व केसरी बंधाऱ्यावरून सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर, चीवार टेकडी, गरड व झिरंग येथील प्रस्तावित पाण्याच्या टाकीपर्यंत पाण्याची नवीन पाईप लाईन घालणे, सावंतवाडी शहरामध्ये वितरण व्यवस्थेसाठी नवीन पाण्याच्या पाईप लाईन घालणेचे काम सुरु करण्यात आलेले आहे. तरी शहरातील पाण्याच्या पाईप लाईन घालणेसाठी रस्ते खोदाई करण्यात येणार आहेत. तरी या ठिकाणी नागरिकांनी वाहने सावकाश चालवा तसेच काहीवेळा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, रस्ते खोदाई करतेवेळी अस्तित्वातील पाण्याची पाईप लाईन फुटण्याची किंवा नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. अशा वेळी पाणीपुरवठा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे काही वेळा शहरातील पाणी पुरवठ्याबाबत गैरसोय होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सावंतवाडीतील पाणी पुरवठा योजना सुधारित करण्याचे काम सुरु…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES