दोडामार्ग,ता.११: हेवाळे येथील राम मंदिराला वर्धापनदिनानिमित्त ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी मानकऱ्यांच्या हस्ते श्री. राऊळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, युवासेना तालुकाअधिकारी मदन राणे, प्रदीप सावंत, संदेश वरक आदी उपस्थित होते. श्री. राऊळ यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत
दोडामार्ग तालुक्यातील गाव भेटी घेतल्या. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यासह लोकांशी संवाद साधला. दरम्यान हेवाळे येथील मंदिराला त्यांनी पदाधिकाऱ्यांसह भेट देत शुभेच्छा दिल्या.