गिरीश गद्रे; महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…
वेंगुर्ला,ता.११: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय वेंगुर्ला येथे गेल्या एक महिन्यात ५० पेक्षाही जास्त रुग्णांच्या मोफत नेत्र शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती डॉक्टर गिरीश गद्रे यांनी वेंगुर्ला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तरी या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा नेत्र रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गद्रे यांनी केले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मधुमेहावरील नेत्रपटल निदान व लेझर उपचार,रेटिनल डिटेचमेंट शस्त्रकिया,नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शनची सोय ,लासरू (अश्रूपिशवी)वरील शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या अपघातावरील उपचार,तिरळेपणा वरील शस्त्रकिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर उदभवणाऱ्या दोषांवरील उपचार तसेच १८ वर्षा खालील मुलांचे मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया या सुविधा मिळणार आहेत.सदर सुविधा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रेशनकार्ड धारकांसाठी मोफत मिळणार आहे.डॉ. गद्रे आय केअर अँड लेसर सेंटर कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, देवगड याठिकाणी नेत्र रुग्णांची तपासणी करून वेंगुर्ला येथील डॉ. गद्रे आय केअर अँड लेसर सेंटर पाटील चेंबर्स ,दाभोली नाका वेंगुर्ला येथे दर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती डॉ. गिरीश गद्रे यांनी दिली तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा नेत्र रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी उदय दाभोलकर व राजेंद्र म्हेत्रे आदी उपस्थित होते.