Wednesday, July 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याओरोस येथील रविंद्र चव्हाण यांचा प्रामाणिकपणा....

ओरोस येथील रविंद्र चव्हाण यांचा प्रामाणिकपणा….

वाटेत सापडलेला किंमती मोबाईल केला परत…

ओरोस ता 3

अणाव येथील मुलीचा 15 हजार रूपये कींमतीचा वाटेत पडलेला मोबाईल मिळाल्यानंतर तो त्या मुलीला परत करीत ओरोस येथील रविंद्र रामचंद्र चव्हाण यांनी प्रामाणिकपणा दाखविला आहे. चव्हाण यांच्या या मानुसकीचे सदर मुलीसह ओरोस पोलिसांनी व नागरिकांनी कौतुक केले.

अणाव येथील एक तरुणी पडवे येथील नर्सिंग कॉलेजला जात असताना वाटेत तिचा मोबाईल पडला. ओरोस येथे आल्यावर आपला मोबाईल पडल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे ती आलेल्या मार्गाने पुन्हा मोबाईल शोधत गेली. मात्र, मोबाईल सापडून आला नाही. विवो कंपनीचा 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल गहाळ झाल्याने त्या मुलीने आपल्या आईसह सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे गाठत मोबाईल हरविल्याची तक्रार दिली.

याच दरम्यान सिंधुदुर्गनगरी येथील कृषि कॉलेजमध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेल्या रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्गनगरी येथील गरुड सर्कल येथून जात असताना त्यांना हा मोबाईल मिळाला. त्यांनी तात्काळ ओरोस फाटा येथील खडपकर कॉम्प्लेक्स मधील मोबाईल शॉपीचे दूकान असलेल्या नीलेश जाधव यांच्याकडे जात याबाबत सांगितले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळविण्याचा निर्णय घेत सिंधुदुर्गनगरी पोलिस थाणे गाठले. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार झाल्याने तोच मोबाईल असल्याची खात्री करीत प्रभारी पोलिस निरीक्षक एस पी पवार व ठाणे अंमलदार मल्लिकार्जुन ऐहोळे यांनी तो मोबाईल त्या मुलीला परत केला. याबाबत सदर मुलीने आपले आभार व्यक्त करण्यास माझ्याजवळ शब्द नसल्याचे सांगत ऋण व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments