बबन साळगावकर:संकेत,संकेतस्थळावर बोलणार नाही,सुचक विधान…
सावंतवाडी.ता,०३:
कोणी कितीही शक्तिप्रदर्शन करो, माझा विषय निश्चित आहे. मी तब्बल वीस हजाराच्या मताधिक्क्याने निवडून येईन असा विश्वास नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर यांनी आज येथे व्यक्त केला.
आपण आज नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, गेली अकरा वर्षे आपल्याला सहकार्य करणाऱ्या नागरिकांचा मी आभारी आहे. यापुढेही त्यांनी आपल्याला असेच सहकार्य करावे अशीही भावनिक साद श्री साळगावकर यांनी घातली दरम्यान आपण संकेत,संकेतस्थळावर बोलणार नाही असे सूचक विधान त्यांनी केले.
साळगावकर यांनी आज आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षनिरीक्षक अर्चना घारे, पुंडलिक दळवी, सत्यजित धारणकर उपस्थित होते.
यावेळी श्री साळगावकर म्हणाले आपण आता नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे येणाऱ्या विधानसभेसाठी आपण राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज भरणार आहे. शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला. उद्या बारा वाजता मी माझा अर्ज सादर करणार आहे. तत्पूर्वी येथील मातृछाया मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्यात येणार आहे.या वेळी आपण शक्तीप्रदर्शन करणार नाही. यावेळी सौ घारे म्हणाल्या मी नाराज नाही.मी शरद पवारांचे नेतृत्व मानणारे कार्यकर्ती आहे. त्यांनी माझ्याकडे सावंतवाडी मतदार संघाची जबाबदारी दिली होती त्यांनी या ठिकाणी पक्ष संघटना वाढविण्यासाठी मला पाठवले होते. मात्र पक्षाच्या सूचनेनुसार याठिकाणी जर साळगावकर यांना संधी दिली तर आपला त्यांना पाठिंबा आहे.