वेंगुर्ले : ता.३
पुणे येथे झालेल्या अभिनव स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे हायस्कूलची कु.भाविका लक्ष्मण खानोलकर हिने पखवाज वादन कलाप्रकारात विशेष प्राविण्य संपादन केले.
या स्पर्धेत विविध कला प्रकारात एकूण ३२१२ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून केवळ ३१ विद्यार्थ्यांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती. तर ह्या स्पर्धेसाठी संपूर्ण देशातून १४८० विद्यार्थी सहभागी झाली होते.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण पुणे येथील यशवंतराव चव्हाण अकॅडमीच्या भव्य रंगमंचावर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भारतीय नीती आयोगाचे प्रमुख डॉ.राजीव कुमार, भारतीय पदमश्री पुरस्कार विजेते डॉ.विजय केळकर यांच्या हस्ते भाविकाला सन्मानित करण्यात आले.
भविका ही वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध पखवाजवादक श्री.निलेश पेडणेकर यांच्याकडे पखवाज वादनाचे शिक्षण घेत असून प्रशालेचे मुख्याध्यापक सौ.स्वाती वालावलकर, सहकारी शिक्षकवृंद तसेच संस्था कार्यवाह, ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले.
वेतोरे हायस्कूलची कु.भविका खानोलकरचे पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या अभिनव स्पर्धेत यश
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES