जोरदार शक्तीप्रदर्शन करत राजन तेलींकडुन उमेदवारी दाखल…

2

कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; मतदारांचे घेतले आशीर्वाद….

सावंतवाडी ता.०३ :

भाजपाचे बंडखोर उमेदवार तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.दरम्यान शक्ती प्रदर्शनासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत हजारोच्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
येथील रवींद्र मंगल कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी श्री.तेली यांनी भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधत मतदारांचे आशीर्वाद घेतले.नंतर रवींद्र मंगल कार्यालय ते येथील बसस्थानकापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली काढतं श्री.तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग,प्रसाद अरविंदेकर,उमेश कोरगावकर आदी उपस्थित होते.

7

4