पोलीस चौकशीत माहिती उघड; मुलगा नातेवाईकांच्या ताब्यात…
सावंतवाडी ता.०३: मोबाईलवर गेम खेळण्यास आई-वडिलांकडून विरोध करण्यात आल्याच्या रागातून माठेवाडा येथील निखील गुप्ता या शाळकरी मुलाने मध्यप्रदेश गाठल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.काल त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांने झालेला प्रकार पोलिसांना सांगितला.यात कमी मार्क पडल्यामुळे आपल्याला आई-वडील ओरडले होते.संबंधित मुलगा मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात होता.हा सर्व प्रकार हरीराम नावाच्या एका ट्रक चालकांमुळे उघड झाला.त्याला संशय आल्याने त्या चालकाने त्याची चौकशी केली.मात्र माहितीत विसंगती आढळून आल्यामुळे त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
याविषयी माहिती मिळतात सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, कर्मचारी प्रमोद काळसेकर यांनी त्या ठिकाणी जावून त्याला ताब्यात घेतले.याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्या तून देण्यात आली.