उमेदवारी जाहीर झालेल्या काका कुडाळकर यांच्याकडून ऐनवेळी माघार…
सावंतवाडी काँग्रेसचे तिकीट काका कुडाळकर यांनी नाकारल्यानंतर हे तिकीट काँग्रेसचे अधिकृत जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांना मिळण्याची शक्यता आहे.याबाबतची अधिकृत घोषणा रात्री उशिरापर्यंत होईल,असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.
त्याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार म्हणून काका कुडाळकर यांना संधी देण्यात आली होती. काल रात्री उशिरा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र आयत्यावेळी श्री. कुडाळकर यांनी आपण आपले जुने मित्र दत्ता सामंत यांना सहकार्य करू,असे सांगून ही सीट लढविण्यास नकार दिला. त्यामुळे आता काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या तिकीटाचे मानकरी श्री. मोंडकर ठरण्याची शक्यता आहे. त्यांनी यापूर्वी आपल्याला उमेदवारी देण्यात यावी, अशी पक्षाकडे मागणी केली होती. त्यामुळे आता त्यांचे अधिकृत नाव रात्री जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.