माळगावात स्वाभिमानला मोठा धक्का…

97
2
Google search engine
Google search engine
Google search engine

हुमरस वाडीतील उपसरपंच संदिप जाधव यांच्यासह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश…

मालवण, ता. ४ : तालुक्यातील माळगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तालुक्यात होत असलेल्या विविध विकास कामांमुळे प्रेरित होत तसेच माळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण शिवसेना नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे असे उपसरपंच श्री.जाधव यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत गाव अध्यक्ष गुरुनाथ परब, मेघश्याम परब, अनिल परब, महेश परब, पांडुरंग परब, सुधीर परब, पद्माकर परब, देविदास परब, श्रीकृष्ण परब, मंगेश परब, रोहन परब, स्वाती परब, दीप्ती परब, शिल्पा परब, आर्या परब, शुभम वारंग, दीपक चव्हाण, दर्शना परब, स्नेहल परब, मनीषा परब, दिव्या चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
आमदार नाईक म्हणाले, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कुडाळ- मालवणमध्ये गेल्या चार वर्षांत अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. गावागावात जाऊन मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यापुढेही विकासकामांची ही गंगा अशीच सुरू राहील. उप सरपंच, ग्रामस्थांनी आपल्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपण या विश्वासाला पात्र राहून या भागातील विकास कामे मार्गी लावू. त्याचबरोबर प्रवेशकर्त्यांचा शिवसेना पक्षात योग्य तो मान, सन्मान राखला जाईल अशी ग्वाही श्री. नाईक यांनी दिली.
हरी खोबरेकर म्हणाले, आम्हाला बाळासाहेबांनी एक शिकवण दिली आहे की शिवसैनिकांनी जनतेसाठी जनतेचे सेवक म्हणून काम करावे. त्याच प्रमाणे आमचे खासदार, पालकमंत्री, आमदार हे जनतेचे सेवक म्हणून काम करतात. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामस्थांची उपजिविका वाढली पाहिजे. शासनाच्या विविध योजनांमधून महिलांना, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमचे पालकमंत्री, खासदार, आमदार हे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. यावेळी विविध योजनांचे खोबरेकर यांनी मार्गदर्शन केले व शिवसेना परिवारात प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
मंदार केणी म्हणाले, आम्ही शिवसेना पक्षप्रवेश केला त्यापासून आम्हाला जो मानसन्मान मिळाला त्याने मी भारावून गेलो आहे व त्यामुळे मी शिवसेना पक्षवाढीच काम हे करत राहणार आहे.
यावेळी विभाग प्रमुख विजय पालव, उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण, शाखा प्रमुख शशिकांत सरनाईक, युवासेना युवा उपजिल्हा अधिकारी पंकज वर्दम, छोटू ठाकूर, नाना नेरकर, युवासेना युवा उपतालुका अधिकारी अमित भोगले, किशोर कासले, युवासेना युवा उपशहर अधिकारी अक्षय रेवंडकर आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\