प्रसाद लाड यांची ग्वाही : कार्यकर्त्यांचीही समजूत काढणार..
कणकवली ता.४ :
राज्यात तसेच सिंधुदुर्गात युतीच्या उमेदवाराच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे ते बंड आम्ही शमवणार आहोत. सावंतवाडीत राजन तेली आपली बंडखोरी मागे घेतील तसेच तेथील भाजप कार्यकर्त्यांची ही समजूत काढली जाईल अशी ग्वाही भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी येथे दिली.
येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले, राजन तेली तसेच राज्यभरात इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते केली पाच वर्षे आपापल्या मतदारसंघात मेहनत घेत आहेत त्यामुळे सर्वांनाच तिकीट मागण्याचा हक्क आहे मात्र महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे त्यामुळे सर्वानी युती धर्म पाळायला हवा. सावंतवाडीसह
महाराष्ट्रात कुठेच बंडखोरी होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत येत्या ७ ऑक्टोबर पर्यंत सर्व बंडखोरांची आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली