माजी नगरसेवक उमेश कोरगावकर पुन्हा स्वगृही…

2

सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदाची ऑफर: पालकमंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत होणार शिवसेनेत प्रवेश…

सावंतवाडी ,ता.०४:

शिवसेनेचे तत्कालीन कट्टर शिवसैनिक तथा गेले काही दिवस भाजपात असलेले माजी नगरसेवक उमेश कोरगावकर पुन्हा एकदा शिवसेनेत दाखल होणार आहेत. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या पोट निवडणुकीत त्यांना नगराध्यक्षपदाची ऑफर देण्यात आल्याचे समजते.लवकर त्यांचा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे.
वयाच्या एकविसाव्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आलेले श्री कोरगावकर हे तत्कालीन कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात. तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी शिवसेनेची एकही शाखा जिल्ह्यात होऊ देणार नाही असा दावा केल्यानंतर कोरगावकर यांनी या ठिकाणी शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम केले होते. त्यानंतर नारायण राणे हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेची धुरा कोरगावकर यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. या सर्व गोष्टीमुळे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे ते बऱ्यापैकी चर्चेत आले होते.दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता सध्या ते शांत होते.
आता त्यांना पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची ऑफर देण्यात आल्याचे समजते उद्या होणाऱ्या पोट निवडणुकीत त्यांना नगराध्यक्ष पदासाठी संधी देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

5

4