बोलावणं आलं तर उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही जाणार…

106
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नारायण राणे यांची ग्वाही: शिवसेनेने युती धर्म पाळण्याचे आवाहन…

कणकवली, ता. ४ :

राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे. त्यामुळे युतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली आणि त्यात बोलावणं आलं तर तेथे जाऊन शिवसेना उमेदवाराचा प्रचार करायलाही आम्ही तयार आहोत. त्याच धर्तीवर शिवसेनेने देखील युतीचा धर्म पाळावा असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी येथे केले. कणकवली मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना आपला उमेदवार उभा करणार नाही. तसे केल्यास राज्यातील युती भंग होऊ शकते असेही ते म्हणाले.

येथील भाजप कार्यालयात नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे हे आता भाजपचे तथा युतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग सह राज्यात इतर ठिकाणी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार का? असा प्रश्न श्री राणे यांना विचारला असता, युतीचा धर्म पाळावा लागेल. जर शिवसेनेकडून बोलावणे आले तर उद्धव ठाकरे यांच्या सभेत जाऊनही आम्ही प्रचार करायला तयार आहोत. मात्र बोलावणं यायला हवं. तसंच कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारातही शिवसेनेने सहभागी व्हायला हवे. युतीचा धर्म त्यांनी पाळायला हवा असे श्री राणे म्हणाले.
स्वाभिमान पक्षाचे भाजपात विलीनीकरण केव्हा होईल या प्रश्नावर बोलताना श्री राणे म्हणाले, स्वाभिमान पक्षाचे विलिनीकरण टप्प्याटप्प्याने होणार आहे. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल त्यावेळी मोठ्या दिमाखात हा विलीनीकरण सोहळा होईल. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आपण नंतर बोलू असेही श्री राणे म्हणाले

\