कुडाळ मालवण अपक्ष उमेदवार दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज सादर करते वेळी जोरदार शक्तिप्रदर्शन ..

2

कुडाळ ता.०४:

“जिथे दत्ता तेथे सत्ता ,, हजारो कार्यकर्ते रोड पूर्णपणे ओव्हरफ्लो झाला आहे .दत्ता सामंत “आगे बढो हम तुम्हारे साथ “है अशी घोषणा देत कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले.दत्ता सामंत पाचशे ते सहाशे गाड्यांच्या ताब्यातून यातून प्रदर्शनांमध्ये सामील झाले.
दत्ता सामंत म्हणाले पुढील भावी आमदार मीच असेल माझ्यावर तुम्ही ठेवलेला विश्वास योग्यवेळी सार्थकी लावेल सामान्य माणूस आहे तुमचा कार्यकर्ता आहे. म्हणून काम करेल कुठलाही साहेब म्हणून काम करणार नाही. असं सूचक वाक्य दत्ता सामंत यांनी केले. स्वर्गही बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांनी दिलेली शिकवण 80 टक्के समाजकारण हे २० टक्के राजकारण बोधवाक्य घेऊन मी आजपर्यंत काम करत आलोय. आज शिकवण राणे साहेबांकडून मी घेतली आहे जनतेने दिलेला कधीही विसरणार नाही असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत ,रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सरचिटणीस विशाल परब ,विकास कुडाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

11

4