विकासाचा आभास जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीच माझा लढा…

117
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बबन साळगावकर; केसरकरांना ओळखायला मला पंधरा वर्षे लागली…

सावंतवाडी ता.०४: विकासाचा आभास करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकरांना विकास काय असतो,हे दाखवण्यासाठी आपला लढा आहे.केसरकारांना ओळखायला मला पंधरा वर्ष घालवावी लागली.मात्र आता विकासाचा आभास म्हणजे काय ? हे या निवडणुकीच्या माध्यमातून मी जनतेपर्यंत पोहोचणार आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तुमचा हक्काचाच आमदार मिळेल,असा विश्वास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे युतीचे उमेदवार बबन साळगावकर यांनी आज येथे व्यक्त केला.श्री.साळगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.
श्री.साळगावकर पुढे म्हणाले विकासाच्या नावाखाली केसरकरांनी विविध घोषणा करून फक्त जनतेसमोर विकासाचा आभास निर्माण केला आहे.हे सर्व ओळखायला मला पंधरा वर्षे लागली,हे माझे दुर्भाग्य आहे.मात्र आता या आभासाच्या अंधारात जनता राहता कामा नये,यासाठी प्रचारा दरम्यान हाच आभास मी मतदारा पर्यंत पोहोचणार आहे.आणि त्यादृष्टीने मित्र पक्षासोबत घटक पक्ष सुद्धा माझ्या ठामपणे पाठीशी उभे आहेत.त्यामुळे वीस हजार पेक्षा जास्त मतांनी मी नक्कीच निवडून येईन असेही त्यांनी सांगितले.

\