साळगावकरांसह अर्चना घारेंना एबी फॉर्म; दुटप्पी धोरणामागे दडलय तरी काय …?
सावंतवाडी/अमोल टेंबकर
येथील विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना राष्ट्रवादीकडून तिकीट जाहीर झालेले असतानाच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून रातोरात यापूर्वी येथे इच्छुक असलेल्या पक्ष निरीक्षक
अर्चना घारे यांना एबी फाॅर्म देण्यात आला आहे. त्यामुळे नेमका आघाडीचा उमेदवार कोण असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तर दुसरीकडे सौ.घारे यांनी आपले वेगळे शक्तीप्रदर्शन करीत आयोजित आघाडीच्या मेळाव्यात आपली उपस्थिती दाखवली. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आम्ही जनमानसापर्यंत राष्ट्रवादी पोहोचली असा दावा केला. त्यामुळे नेमके या दोन एबी फॉर्म मध्ये काय दडले. हे मात्र कळू शकले नाही. याबाबत सौ.घारे यांना विचारले असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. आपल्याला रात्री तीन वाजता पक्ष निरीक्षक विलास माने यांनी फॉर्म आणून दिला त्यामुळे आपण आज उमेदवारी अर्ज भरला आता पुढचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे त्यांनी सांगितले