निवडणूक निरीक्षक राजेंद्र किशन जिल्ह्यात दाखल…
सिंधदुर्गनगरी, ता. ४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील २६८ – कणकवली, २६९ – कुडाळ आणि २७० सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून राजेंद्र किशन, आयएएस यांची निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. किशन हे दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत ते एमआयडीसी शासकीय विश्रामगृह, कुडाळ येथील सभागृहात दुपारी ३ ते ४ या वेळेत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक ०२३६२-२२३५८५ असा असून मोबाईक क्रमांक ९४२३९४४५२५ असा आहे. या व्यतिरिक्त उर्वरीक कार्यालयीन वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कणकवली, कुडाळ व सावंतवाडी यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असतील.