नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता उमेदवारी मागे घेतल्याने कारवाई ; जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांची माहिती…
कुडाळ ता. ४ :
काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीला विश्वासात न घेता काँग्रेसचे उमेदवार काका कुडाळकर यांनी कुडाळ मतदार संघातून अचानक माघार घेतल्याने त्यांची काँग्रेस पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे कुडाळ मालवण मतदारसंघातून भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले काका कुडाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काका कुडाळकर यांनी पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता उमेदवारी मागे घेऊन अपक्ष उमेदवार व त्यांचे सहकारी दत्ता सामंत यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. पक्षांनी याची गंभीर दखल घेत काका कुडाळकर यांची काँग्रेस पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी केली आहे.
यावेळी माजी आमदार सुभाष चव्हाण, पुष्पसेन सावंत, विकास सावंत, विलास गावडे, आबा मुंज, विजय प्रभू, अरविंद मोंडकर, दादा शिरसाट, श्रीकृष्ण तळवडेकर आदी उपस्थित होते.