वेंगुर्ले-दाभोली सड्यावर आकाशातील विजेचा थरार…

128
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विजेच्या धक्क्याने पक्षी मृत्यूमुखी व जनावरे जखमी…

वेंगुर्ले : ता.४

परतीच्या पावसाने नेहमीच नुकसान होत असत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे त्याचा प्रत्यय आला .वेंगुर्ला शहर आणि शहरालगतच्या परिसरात आज दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या लखलखाटामुळे संपूर्ण परिसर हादरून निघाला. या विजेचा फटका काही भागात चांगलाच बसला आहे. पक्षी आणि जनावरे जखमी झाली.
वेंगुर्ले परिसरात आज दुपारपासून तुरळक पावसासोबत ढगांचा गडगडाट व विजेच्या आवाजासोबत संपूर्ण शहर परिसर व शहरालगतचा परिसर दणाणून सोडला. या जोरदार विजेच्या माऱ्याने वेंगुर्ले दाभोली सड्यावर काही जनावरांना फटका बसला. दाभोली सडा येथील एका कुटुंबातील चक्क दोन म्हैसी वरती वीज कोसळली आणि त्या म्हैसीना लकवा मारला. गुरांसोबत अनेक पक्षी ही त्यात मृत्युमुखी पडले. त्याचप्रमाणे विजेचा मारा एवढा होता की चक्क येथील जमिनीला मोठमोठ्या भेगा ही पडल्या असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान याबाबत तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात मात्र कोणतीच कल्पना रात्रीपर्यंत नव्हती.

\