Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedश्री देव उपरलकरचा गुरूवारी वार्षिक उत्सव...

श्री देव उपरलकरचा गुरूवारी वार्षिक उत्सव…

सावंतवाडी,ता.०४: ३६५ खेड्याचा अधिपती म्हणून ओळखला जाणारा श्री देव उपरलकर देवाचा वार्षिक उत्सव गुरुवार ता.६ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सायंकाळी ७ वाजता महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. दरम्यान उत्सवाच्या निमित्ताने भक्तगणांकडून देवस्थान परिसर सुशोभित करण्यात आला आहे. त्या ठिकाणी तिरुपती बालाजीचे सेल्फी पॉईंट आकर्षण ठरणार आहे. यावेळी सर्व भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख मानकरी विद्याधर नाईक-शितप व शुभम नाईक-शितप यांच्याकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments