वैभववाडीत विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

100
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी  ता.5

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शहरात शनिवारी पोलिसांनी संचलन केले.
निवडणूक आयोगाने होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी वैभववाडी तहसिल कार्यालयाच्या पटांगणावर मॉब डिस्पोजल सराव घेण्यात आला. त्यानंतर शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नितीन कटेकर यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांनी संचलन केले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण, आरसीपी प्लाटून २, बीडीडीएस, एसएलआर ब्लॕक ग्राऊंड १, टीआरएक्स हँन्डग्रेनेड १, वज्र वाहन, पोलिस कर्मचारी २० व होमगार्ड १० आदी कर्मचारी उपस्थित होते.

\