स्वरूपा विखाळे, राजलक्ष्मी डिचवलकर यांच्या स्वाक्षऱ्या..
सिंधुदुर्गनगरी ता.5
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सर्व सदस्य पदांचा राजीनामा देवून शिवसेनेच्या तिकीटावर कणकवली विधानसभा मतदार संघात उमेदवारी दाखल करणाऱ्या जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी हा राजीनामा त्याच दिवशी मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी प्रशासना जवळ पाठविला आहे. दरम्यान, या राजीनामा पत्रावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्वरूपा विखाळे व राजलक्ष्मी डिचवलकर या दोन जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच सतीश सावंत यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हा परिषद सत्ताधारी गटाचे गतनेते पद सुद्धा खालसा झाले आहे.