बांदयातील शाळकरी मुलीचे अपहरणाची ती “अफवा”

2

बांदा ; ता:५
आज सकाळी बांदा शहरातील शाळेतून विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न बुरखाधारी महिलेकडून झाला असून शिक्षक व विद्यार्थी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला. अशी पोस्ट बांदा शहरात सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र ही निव्वळ अफवा असून अशी कोणतीही घटना आज शहरात घडली नाही. बांदा पोलीस काल घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी शाळेत गेले होते. त्यामुळे पालक व ग्रामस्थांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी केले आहे.

1

4