वैभववाडी ता.०५:
वैभववाडी तालुका धनगर समाज सेवा संस्था, मुंबई यांच्यावतीने गुणवंत विदयार्थ्यांचा गुण गौरव समारंभ रविवार दि.६ आक्टोबर रोजी सुवर्ण मंगल कार्यालय वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्राम विकास अधिकारी एन.डी.बोडेकर, नावळे सरपंच स्नेहा शेळके, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पांडुरंग काळे,चेतन बोडेकर आहेत.कार्यक्रमाला आंबाजी हुंबे, बाबु अडुळकर, लक्ष्मण शेळके, रवळू बोडेकर, शामराव शेळके, गजानन अडूळकर, दत्ताराम गुरखे, दशरथ शिंगारे, नवलराज काळे, अंजना शेळके, रुक्मिणी शेळके, चंद्रकांत बोडेकर, लक्ष्मीबाई बोडेकर, नंदा शेळके आदी उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे.असे आवाहन अध्यक्ष राजू बोडेकर यांनी केले आहे.