‘त्या’ आक्षेपावर सुनावणी पूर्ण…

106
2
Google search engine
Google search engine
Google search engine

निवडणूक निर्णय अधिकारी सहा वाजता निर्णय देणार : निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष…

कुडाळ, ता. ५ :

कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार दत्ता सामंत यांच्या उमेदवारी अर्जावर आमदार वैभव नाईक यांनी घेतलेल्या आक्षेपावर आज दुपारी प्रांत कार्यालयात सुनावणीची प्रक्रिया पार पडली. सायंकाळी सहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी आपला निर्णय देणार आहेत. कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली असून काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेवेळी आमदार वैभव नाईक यांनी सामंत यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावेळी प्रांतांकडे दत्ता सामंत यांनी दोन तासाचा अवधी मागितला होता. त्यानंतर नाईक यांनी घेतलेल्या आक्षेपावर सुनावणी पार पडली. अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी सामंत यांच्या बाजूने युक्तिवाद केला. यावेळी सामंत समर्थकांनी कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली होती.
सुनावणी प्रक्रिया झाल्यावर सायंकाळी सहा वाजता यावरील निर्णय दिला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सामंतांचा अर्ज वैध की अवैध ठरतो यासाठी कार्यकर्त्यांना आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे.

\