बांद्यात शाळांच्या परिसरात बुरखाधारी महिलांचा वावर वाढला…

174
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बंदोबस्त वाढवा; महाराष्ट्र स्वाभिमानची पोलिसांकडे मागणी…

बांदा ता.०५:

बांदा शहरातील शाळांच्या परिसरात बुरखाधारी अनोळखी महिलांचा वावर वाढला आहे. विद्यार्थी तसेच शिक्षकांना गेले आठवडाभर या महिला निदर्शनास पडत आहेत. बांदा पोलीसांनी शाळा परिसरात बंदोबस्त वाढवावा. तसेच शाळा सुटण्याच्या वेळात पेट्रोलिंग करावे, अशी मागणी बांदा शहर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष जावेद खतीब यांनी केली आहे. तसे लेखी निवेदन पोलीस निरीक्षक ए. डी. जाधव यांच्याकडे सादर करण्यात आले.
बांदा शहरात सध्या बुरखाधारी महिलांचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी सावंतवाडीतून एका शाळकरी मुलाचे अपहरण करण्यात आले होते. बांदा शहरात बुरखाधारी महिला शाळांच्या परिसरात निदर्शनास येत आहेत. विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही या बुरखाधारी महिलांना पाहिले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर बांदा शहर स्वाभिमानने लेखी निवेदनाद्वारे बांदा पोलीसांचे लक्ष वेधले. शाळांच्या आवारात बंदोबस्त वाढवावा. शाळा सुटण्याच्या वेळात पेट्रोलिंग करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक ए. डी. जाधव यांनी पालकांनी घाबरुन जाऊ नये. पोलीस प्रशासन आपल्या सोबत असल्याचा विश्चास दिला. अनोळखी व्यक्ती किंवा महिला दिसल्यास तातडीने पोलीसांशी संपर्क करावा. अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले.
यावेळी शहर अध्यक्ष जावेद खतीब, खजिनदार साई धारगळकर, विभागीय युवक अध्यक्ष सागर सावंत, युवक शहर अध्यक्ष संदिप बांदेकर, मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष बाळू सावंत, गणेश म्हाडगुत, सर्वेश मुळ्ये, अजय तारी, दादा साळगावकर, श्रीधर सावंत आदी उपस्थित होते.

\