मनसेच्या सावंतवाडी शहराध्यक्षपदी आशिष सुभेदार…

2

सावंतवाडी ता.०५:

येथील मनसेच्या शहराध्यक्षपदी आशिष सुभेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आज ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी त्यांना ही नियुक्ती दिली.यावेळी प्रकाश रेडकर,ऍड.अनिल केसरकर,गुरुदास गवंडे,विजय सावंत आदी उपस्थित होते.
श्री.आशिष सुभेदार हे गेली अनेक दिवस विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून शहरात कार्यरत होते.त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना याठिकाणी संधी देण्यात आली आहे.त्यांची निवड होताच कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर,अतुल केसरकर, सुधीर राऊळ आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.आज येथे आयोजित एका मनसेच्या मेळाव्यात त्यांची ही निवड करण्यात आली.

9

4