Wednesday, April 30, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी सश्रम कारावास 20 हजार रुपयांचा दंड....

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी सश्रम कारावास 20 हजार रुपयांचा दंड….

जिल्हा विशेष न्यायालयाचा निर्णय….

सिंधुदुर्गनगरी ता. 5
घरात एकटी असल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी आनंद वामन धुरी (४४) रा. धुरीवाडा हिवाळे, मालवण याला विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी ३ वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रूपेश देसाई यांनी काम पाहिले.
मालवण तालुक्यातील एका गावातील पीडीत अल्पवयीन मुलीच्या घरातीत सर्व मंडळी २० मे २०१८ रोजी घरात नसल्याने तेथे आनंद धुरी याने जात तिच्याकडे पिण्यास पाणी मागितले. तसेच टीव्हीवर मॅच लावण्यास सांगितली. मॅच संपल्याने परत जात असताना धुरी याने अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते. याबाबतची फिर्याद पीडीत मुलीने २१ मे २०१८ रोजी पोलिसात दिली होती. त्यानुसार धुरी यांच्यावर भादवि कलम ३५४, ४५२ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याच्या तपासात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. तर पीडीत मुलीची साक्ष महत्वाची ठरली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने धुरी याला दोषी ठरवत भादवी कलम ३५४ अन्वये २ वर्षे साधा कारवास आणि ५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १ महीना जादा कैद, ४५२ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १ महीना जादा कैद, पोक्सो ८ नुसार ३ वर्षे कैद अणि १० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास २ महीने जादा कैद अशी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments