वेंगुर्लेतील घटना:परिसरात भितीचे वातावरण,बंदोबस्ताची मागणी
वेंगुर्ले.ता.६: तालुक्यातील पाल – गोडावणेवाडी येथील सुधीर भगवान गावडे यांच्या गायीचे दोन महिन्याचे वासरू बिबट्याने गोठ्यातून उचलून नेऊन त्याचा फडशा पाडला.
पाल भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे.भक्ष्याच्या शोधात बिबट्या आता लोकवस्ती पर्यंत येऊ लागला आहे.काल रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास गिठ्यात बांधून ठेवलेले गायीचे वासरू बिबट्याने उचलून धूम ठोकली.
गुरांच्या ओरडण्यामुळे गावडे कुटुंबीय आणि आजूबाजूचे घरा बाहेर आले.मात्र तो पर्यंत बिबट्या त्या वासराला घेऊन तेथून पसार झाला होता.आज सकाळी सुद्धा त्या वासराला शोध घेतला पण ते कुठेच सापडले नाही. तरी या बिबट्याचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.