कुत्रा आडवा आल्याने अपघात ; महिलांना किरकोळ दुखापत…
माणगाव, ता. ६ : खोऱ्यामधील नानेली गावामध्ये नानेली ते कुडाळ एमआयडीसी काजू फॅक्टरी मध्ये काम करण्यासाठी महिलांना ने -आण गाडीचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजता घडली. नानेली वरुन जाताना रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने अचानक गाडीचा ब्रेक न लागल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला जात गटारामध्ये पलटी झाली. गाडीमध्ये चार ते पाच महिला कामगार बसलेल्या होत्या. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली.
ही माहिती कळताच गावातील ग्रामस्थ शिवाजी आरेकर, मनोहर मिस्त्री, संतोष नार्वेकर यांनी मदतीची हाक देऊन गाडीमधील महिलांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.