“विश्वास” हरलो तर पुन्हा मत मागायला येणार नाही

113
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राजन तेली: प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी केसरकरांवर टीका

सावंतवाडी ता.०६: मला एक संधी द्या,त्याचे मी सोने करीन.आमदार झाल्यानंतर काम करु शकलो नाही,तुमचा विश्वास हललो तर पुन्हा मत मागायला येणार नाही.असे
भावनिक आवाहन येथील विधानसभा मतदारसंघाचे भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केले.त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ आज माडखोल येथून सुरू केला.यावेळी रोजगार आरोग्य या मुद्द्यावर आपण पुढील निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.तेली यांच्या उपस्थितीत माडखोल मधील काही ग्रामस्थांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग,माडखोल सरपंच बाळू शिरसाट,सत्यजित तावडे,चंद्रकांत चव्हाण,शिवाजी राऊळ, दत्ता कोळेमेकर,मनोज लातये, हरीश लातये आदी उपस्थित होते
यावेळी तेली म्हणाले आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांसारखे फक्त आश्वासने देऊन फसवणार नाही.ती दिलेली आश्वासन निश्चितच मी पूर्ण करणार आहे।केसरकरांनी आंबोली काबूलायतदार गावकर सारखा प्रश्न सत्तेत असताना सुद्धा रेंगाळत ठेवला,परंतु तो प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न केले .
आपण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद असा प्रवास करून आज इथंपर्यंत आलेलो आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच आपण सावंतवाडी मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न करू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

\