Monday, April 21, 2025
Google search engine
Homeकोंकण पर्यटनमनसेच्या वेंगुर्ले शहराध्यक्षपदी अमोघ नरसुले यांची निवड...

मनसेच्या वेंगुर्ले शहराध्यक्षपदी अमोघ नरसुले यांची निवड…

वेंगुर्ले ता.०६: येथील मनसेच्या शहराध्यक्षपदी अमोघ नरसुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.येथील पदाधिकारी मेळाव्यात आज ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी त्यांना ही नियुक्ती दिली.
श्री नरसुले यांनी तळवडे व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदाची धुरा सुद्धा सांभाळली आहे.तसेच ते सामाजिक कार्यातही अनेक वर्षे पुढे आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली.
यावेळी सावंतवाडी विधानसभेचे उमेदवार प्रकाश रेडकर,ॲड.अनिल केसरकर,एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर,वेंगुर्ला तालुकाअध्यक्ष विजय सावंत,गुरुदास गवंडे,अतुल केसरकर,आशिष सुभेदार,गिरीधर घोगळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments