पालकमंत्र्यांनी जावयांकडे दिलेली “ती” डायरी गेली कुठे…?

102
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तेलींचा केसरकरांना सवाल;विधानसभा आली तरी पाण्याचा प्रश्न सुटला नाही…

सावंतवाडी ता.०६:

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीत मतदार संघातील पाण्याच्या प्रश्नांबाबत आपल्या जावयाकडे दिलेली डायरी नेमकी गेली कुठे,असा प्रश्न करत केवळ आश्वासने देऊन खोटे बोलण्याचे पाप पालकमंत्री दीपक केसरकर करत आहेत,असा आरोप भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केला.आपण यापुढे निवडणूक लढणार नाही,ही शेवटची टर्म आहे,असे सांगून लोकांना गळी उतरवणार्‍या केसरकरांच्या पाठीमागे कोण नारळ घेऊन गेला का ? ,असाही प्रश्न विचारून तेली यांनी त्यांची खिल्ली उडवली.
श्री.तेली यांनी सांगेली येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली.यावेळी त्यांनी श्री.केसरकर यांच्यावर टीका केली.ते म्हणाले,.पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचा प्रचार करताना आपल्या जावयाला सोबत आणले होते.यावेळी मतदारसंघाला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न नक्कीच सोडवू असे आश्वासन देऊन हे सर्व प्रश्न आपल्या जावयांना डायरीत लिहून ठेवायला सांगितले होते.ती डायरी मुंबईत गेल्यानंतर कॉम्प्युटरमध्ये हे प्रश्न फिड करू आणि त्यानंतर संबंधित ग्रामस्थांना रिप्लाय देऊ असे केसरकर यांनी आश्वासन दिले होते.परंतु लोकसभा निवडणूक संपून आता विधानसभा आली तरी हे काही प्रश्न सुटले नाहीत,त्यामुळे त्यांनी जावयांकडे दिलेली डायरी नेमकी गेली कुठे असा प्रश्न तेली यांनी केला.
खोटे पण रेटून बोलणाऱ्या पालकमंत्र्यांची डायरी कायमची बंद करा,असेही त्यांनी सांगितले.आपली शेवटची टर्म आहे असे सांगून पुन्हा निवडणूकित उतरलेल्या केसरकर यांच्या पाठीमागे कोण नारळ घेऊन गेला होता का ? असा प्रश्न तेली यांनी केला.यावेळी राजन राऊळ, लवू भिंगारे,सुरजी राऊळ,रामचंद्र राऊळ,बाळा सरगावकर,विठ्ठल वारंग, लक्ष्मण घाडी,महेश राऊळ,चंद्रकांत सनम,आप्पा लाड,बाळा सनम आदी उपस्थित होते.

\