वैभव नाईक यांच्याकडून अँड.वीरेश नाईक यांचा सत्कार….

98
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सामंतांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरविण्यासाठी केलेल्या युक्तिवादाला दाद…

कुडाळ ता.०६:

कुडाळ-मालवण मतदार संघाचे अपक्ष उमेदवार दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरवण्यासाठी युक्तिवाद करणाऱ्या अँड.वीरेश नाईक यांचा आज आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या कणकवली येथील कार्यलात जाऊन त्यांचा सत्कार केला.
काल या निकालाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.दरम्यान श्री.नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कुडाळ यांच्यासमोर आमदार वैभव नाईक यांची बाजू अतिशय समर्थपणे,रोखठोक व निर्भीडपणे मांडली.त्यामुळेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी श्री.सामंत यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला.त्याला दाद देण्यासाठी हा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक सुशांत नाईक,भूषण परुळेकर,भास्कर राणे,बाळू पारकर आदी उपस्थित होते.

\