अपयशाला खचून जावू नका!

109
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राजू बोडेकर; १० वी, १२ वी पदवीधर गुणवंतांचा सत्कार समारंभ

वैभववाडी ; ता :६   एखाद्या परीक्षेत कमी गुण पडणे किंवा नापास होणे म्हणजे सगळे संपले, असा विचारही मनात आणू नका. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असे अनेकांनी सिद्ध केले आहे. तेव्हा खचून न जाता प्रयत्नात सातत्य ठेवा. असे प्रतिपादन राजू बोडेकर यांनी व्यक्त केले.
वैभववाडी येथील सुवर्ण मंगल कार्यालयात वैभववाडी तालुका धनगर समाज सेवा संस्था, मुंबई यांच्यावतीने १० वी, १२ वी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व उद्योजक मान्यवरांचा सत्कार समारंभात अध्यक्ष म्हणून बोडेकर बोलत होते. यावेळी माजी ग्रामविकास अधिकारी एन. डी. बोडेकर, सरपंच श्रीमती स्नेहा शेळके, उपसरपंच रूक्मिणी शेळके, माजी उपसभापती अंबाजी हूंबे, अॕड. विक्रमसिंह काळे, बाबू अडुळकर, लक्ष्मण शेळके, रवळू बोडेकर, शामराव शेळके, गजानन अडुळकर, दत्ताराम गुरखे, दशरथ शिंगारे, नवलराज काळे, अंजना शेळके, चंद्रकांत बोडेकर, श्रीमती लक्ष्मीबाई बोडेकर, नंदा शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष बोडेकर म्हणाले, तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेवून स्पर्धा परीक्षेत उतरले पाहिजे. तसेच आपल्या बरोबर समाजातील मुलांनाही मार्गदर्शन केले पाहिजे. डॉक्टर, इंजिनियर होणे अवघड नाही. फक्त जिद्द, चिकाटी आणि मेहनत असल्यास यशालाही गवसणी घालाल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री माऊली क्लिनिकल लॕबोरेटरी बॕनरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सखाराम गुरखे यांनी केले.

फोटो- गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना अध्यक्ष राजू बोडेकर व इतर. छाया- पंकज मोरे

\