वेंगुर्ले-तुळस येथे गवारेड्याच्या हल्ल्यात म्हैस मृत्युमुखी….

122
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.६
तालुक्यातील तुळस येथील बेतवाडी मधील कृष्णा सदाशिव पालयेकर यांची अंदाजे ४०,००० रुपये किंमत असलेली म्हैस सकाळी चरण्यासाठी सोडली असता गवारेड्याने पाठलाग करून तिचा फडशा पाडला.
तुळस गावात सध्या गावरेड्याने उच्छाद मांडला आहे. गवारेड्याने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान करण्यात आले असून गवरेड्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
म्हैशीचा मृत्यु झाल्याचे समजताच सरपंच शंकर घारे, उपसरपंच जयवंत तुळसकर , वनरक्षक सावळा कांबळे यांनी घटनास्थळी दिली भेट. यावेळी सदर गवारेड्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.