पडत्या काळात साथ देतो ,”तो”….सतीश सावंत…

237
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शिवसैनिकांचे राणेंच्या टिकेनंतर सोशल मिडीयावर प्रत्युत्तर…

कणकवली ता ०६:
पडत्या काळात साथ देतो,प्रशासन आणि नियोजनाची उत्तम जाण आहे तो,आणि सामान्य जनतेच्या मनामनात आहे तो…., तो सतीश सावंत,असे प्रत्युत्तर शिवसैनिकांच्या माध्यमातून राणे समर्थकांना देण्यात आले आहे.
सतीश सावंत यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी,कोण सतीश सावंत..? असा उलट प्रश्न पत्रकारांना केला होता.याबाबत जोरदार चर्चा रंगली होती.एकेकाळचे अत्यंत विश्वासू व कट्टर समर्थक असलेल्या सावंत यांनी प्रथम अपक्ष व त्यानंतर शिवसेनेत जाऊन भाजपाचे उमेदवार तथा नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.त्यामुळे आता कणकवली विधान सभेत सावंत विरुद्ध राणे अशी आता लढाईला रंगणार आहे.
या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी सतीश सावंत यांच्याबाबत राणेँना छेडले असता,त्यांनी कोण सावंत असा उलट प्रश्न केला होता.या त्यांच्या प्रश्नाला शिवसैनिकांकडून अत्यंत सूचक पद्धतीने बॅनरच्या माध्यमातून सोशल मीडिया उत्तर देण्यात आले आहे.

\