नावळेत मृत माकड आढळल्याने खळबळ..

2

वैभववाडी ता.०७: 

नावळे धनगरवाडा येथे मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. शेपटीला जखम झाल्याने मृत्यू झाला असल्याचे पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत माकडाचे शवविच्छेदन करून विल्हेवाट लावण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
जिल्ह्यात मृत माकडांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी माकड तापाचे रूग्ण सापडले होते. नावळे धनगरवाडा येथील प्रकाश गुरखे यांच्या घरानजिक भात शेतीत मृत माकड आढळून आले. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान घटनास्थळी वनरक्षक श्री. पाटील, तालुका पशुवैद्यकिय अधिकारी, पर्यवेक्षक डॉ. गवंडे यांनी जावून पाहणी केली. माकडाच्या शेपटीला जखम झाल्याने मृत्यू झाला असल्याचे पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. माकडाचे शवविच्छेदन करून विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी घटनास्थळी ग्रामसेवक श्री. घुगे, ग्रामस्थ भागोजी शेळके, सोनू गुरखे, जगन्नाथ गुरव, रामचंद्र गुरखे उपस्थित होते.

11

4