राणेंना रोखण्यासाठीच निवडणुकीतून माघार…

135
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संदेश पारकर;राणेंना पक्षात घेण्याची गरज काय…?

कणकवली, ता.०७:

राणेंच्या दहशती प्रवृत्तीमुळे त्यांना चार वेळा जनतेने नाकारले आहे. असले पार्सल भाजपात घेऊ नका असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता.मात्र भाजपने निष्ठावंतांनावर अन्याय करून राणेंना प्रवेश दिला आणि कणकवलीतुन उमेदवारी देखील दिली. राणेंचा प्रवेश भाजपाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मान्य नाही़ ज्या राणे प्रवृत्तीशी लढलो,त्या राणेंसोबत काम कसे करायचे? ही भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे़.त्यामुळे राणेंना रोखण्यासाठीच मी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.माझी उमेदवारी कायम राहिली असती तर त्याचा फायदा राणेंना झाला असता.मतविभागाचा फायदा राणेंना होणार होता़.त्यामुळे राणे प्रवृत्ती रोखण्यासाठी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे़.आता कणकवलीतील जनताच नितेश राणेंचे पार्सल कणकवलीत पाठविणार असल्याचा इशारा भाजपा बंडखोर नेते संदेश पारकर यांनी दिला़.
कणकवली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी भाजपाचे बंडखोर नेते अतुल रावराणे, संदेश पटेल, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, अवधुत मालणकर, प्रितम मोर्ये, भाई पारकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते़
भाजपात गेल्या तीन वर्षांपूर्वी मी प्रवेश केला़ प्रवेशानंतर संघटनात्मक बांधणीसाठी काम केले़ या विधानसभेचा प्रबळ उमेदवार म्हणून काम करत असताना विविध उपक्रम राबविले़ आम्ही पक्षात अनेक इच्छुक होतो़ वरिष्ठ नेत्यांना आम्ही सांगितले होते की, कुठल्याही प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, त्याचे आम्ही काम करू़ नितेश राणेंसारखा उमेदवार भाजपात नको़ राणे भाजपात आल्यास हा पक्ष राणेंची भाजपा म्हणून ओळखला जाईल़ ज्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत राणेंविरोधात संघर्ष केला त्यांचे खच्चीकरण होईल़ त्यामुळे आमचा राणे प्रवेशाला विरोध होता़ तरी देखील अंतीम क्षणी प्रवेश देऊन नितेश राणेंना उमेदवारी देण्यात आली़ हा प्रवेश भाजपाच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना मान्य नाही़ त्यामुळे राणेंच्या प्रचारात भाजपाचे कार्यकर्ते उतरणार नसल्याचा दावा संदेश पारकर यांनी केला़
मत विभागणी टाळण्यासाठीच माघार :
कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून नितेश राणे तर शिवसेनेकडून सतीश सावंत यांचा अर्ज कायम राहत आहे़ मी जर लढलो तर सतीश सावंत व माझ्यात राणे विरोधी मतांमध्ये विभागणी होणार होती़ त्यामुळे राणे प्रवृत्ती विरोधात आम्ही लढत आहोत त्या लढाईला संपविण्यासाठी हीच संधी असल्याचे समजून निवडणुक रिंगणातून माघार घेतली़ कुठलीही अभिलाषा न ठेवता शिवसेनेच्या सोबत काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला़ तत्पुर्वी खा़ विनायक राऊत, ना़ दीपक केसरकर, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, आप्पा पराडकर, आ़ वैभव नाईक यांच्याशी आमची चर्चा झाली आहे़ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खा़ संजय राऊत यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा झाली आहे़ हा मतदारसंघ जिंकण्यासाठी १ पाऊल मागे घेतल्याची भावना संदेश पारकर यांनी मांडली़
राणे कुणाशीही प्रामाणिक नाही :
महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांची भूमिका नेहमी बदलणारी ठरली आहे़ ज्या शिवसेनेने राणेंना मुख्यमंत्री केले त्यांच्या विरोधात राणेंनी काम केले़ ज्या काँग्रेसने मंत्रीपद दिले त्यांच्या विरोधात राणे राहिले़ दोनदा मुलाचा आणि दोन वेळा स्वत:चा असे राणेंचे चार पराभव झाले़ त्यानंतर अडगळीत राहिलेल्या राणेंना भाजपाने खा़ बनविले़ त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात स्वाभिमानच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विश्वास यात्रा काढण्यात आली़ त्या विश्वास यात्रेत मोदी-फडणवीस सरकारवर टिका करण्याचे काम राणेंनी केले़ त्यामुळे बदलती राणेंची भूमिका ही भाजपाला घातक आहे़ स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष बदलून प्रामाणिक कार्यकर्त्यांना संपविण्याचा घाट राणेंनी घातला आहे़ भविष्यात सिंधुदुर्गातील भाजपा मोदी-शहांची न राहता ती राणेंची भाजपा होईल, असा टोला संदेश पारकर यांनी लगावला़

बॉक्स :
पारकरांच्या निर्णयामुळे थापाडा आमदार घरी बसेल :
संदेश पारकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज आज मागे घेतला़ या निर्णयामुळे खरा महायुतीचा उमेदवार सतीश सावंत यांच्या रूपाने जनतेला पर्याय मिळाला आहे़ उद्या थापाड्या आमदाराला रोखण्यासाठी १ सांघिक लढत दिली जाईल़ खºया अर्थाने जनतेच्या मनातील भावनांना न्याय देण्याची भूमिका संदेश पारकर यांनी घेतली़ सतीश सावंत निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन जावू़ आम्ही भाजपाच्या कोणत्याही नेत्या विरोधात नाही़ पण आमची भूमिका राणे प्रवेशाच्या विरोधात होती़ आम्हाला विश्वासात न घेता नितेश राणेंना उमेदवारी दिली़ त्यामुळे थापाड्या आमदाराला घरी बसविणार असल्याचा इशारा अतुल रावराणे यांनी दिला़.

\