कुडाळ मालवण मतदारसंघातून 7 उमेदवार निवडणूक रिंगणात

2

खरी लढत नाईक व देसाई: मनसेचे परब काँग्रेसचे मोंडकर नशीब आजमावणार….

कुडाळ ता.०७:

येथील कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात आता सात उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.यात शिवसेनेसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.यातील खरी लढत ही शिवसेनेचे वैभव नाईक विरुद्ध स्वाभिमान पक्षाचे अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्यात होणार आहे.आज अर्ज मागे घेतले त्या दिवशी नेमके चित्र स्पष्ट झाले.अन्य उमेदवारात काँग्रेसचे अरविंद मोंडकर व मनसेचे धीरज परब यांचा समावेश आहे.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी छाननीच्या वेळी नऊ उमेदवार रिंगणात होते.आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती.अर्ज दाखल करण्यामध्ये पंधरा नामनिर्देशन प्राप्त झाली होती.यापैकी दहा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते.अर्ज छाननीच्या वेळी नारायण राणे यांचे समर्थक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत रिंगणात होते. अर्ज छाननीच्या वेळी आमदार वैभव नाईक यांनी ते शासकीय ठेकेदार असल्याची हरकत नोंदविल्यामुळे ते निवडणूक रिगणातून बाद झाले.त्यामुळे अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई व भाजपाचे अतुल काळसेकर हे रिंगणात होते.कोण रिगणात असणार याबाबत दोन दिवस होत असणाऱ्या चर्चेला अखेर आज दुपारी नितेश राणे यांच्या उपस्थितीत श्री.देसाई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.यामुळे अतुल काळसेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला.त्यामुळे खरी लढत शिवसेनेचे वैभव नाईक विरुद्ध स्वाभिमान पक्षाचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्यातच आहे.
राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे चेतन उर्फ अरविंद मोडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब अपक्ष उमेदवार सिद्धेश पाटकर बहुजन समाज पार्टीचे रवींद्र कसालकर वंचित बहुजन आघाडी चे बाळकृष्ण जाधव असे एकूण सात उमेदवार रिगणात आहेत विष्णू मोडकर यांनी आपला अर्ज मागे घेतला विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सर्व पक्षांसह अपक्षानी आपले उमेदवारी केले होते मात्र दत्ता सामंत यांचा अर्ज अवैध ठरल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती ते शासकीय ठेकेदार असल्याने त्याचा अर्ज बाद होणार हे माहिती होते खबरदारी म्हणून उमेदवार रणजित देसाई व अतुल काळसेकर यांनी आपले अर्ज दाखल केले होते निवडणुक निर्णय आयोगानुसार अर्ज अवैध ठरला आणि रणजित देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले या विधानसभा मतदारसंघातून रणजित देसाई अतुल काळसेकर यांच्या नावाबाबत गेले दोन दिवस सातत्याने बैठका होत होत्या अखेर अंतिम टप्प्यात निर्णय घेताना आमदार नितेश राणे यांनी रणजित देसाई यांच्या नावाची घोषणा कुडाळ येथे केली जरी रिंगणात सात उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने लढत ही वैभव नाईक विरुद्ध रणजित देसाई अशीच म्हणावी लागेल वैभव नाईक गेले कित्येक वर्ष या मतदारसंघात जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यरत आहेत घराघरात पोचलेला उमेदवार म्हणून सर्वांच्या नजरेसमोर दिसत आहेत गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या आमदारकीच्या कालावधीत विकासात्मक कायापालट करताना विविध योजना आणल्या रणजित देसाई जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असून नारायण राणे यांचे समर्थक आहेत त्याने आपल्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या कालावधीत कृषी क्षेत्रात घेतलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांनी कृषी क्षेत्रात राज्यस्तरीय कृषी मेळावे घेऊन जिल्हा परिषदेच्या दालनात वेगळा पायंडा पाडला शेती विषयक विविध उपक्रम त्यांनी राबवले आजचे अपक्ष म्हणून रिंगणात असताना त्यांची निशाणी कपाट आहे मात्र आपले कपाट निशाण चिन्ह कुडाळ मालवण दोन्ही तालुक्यांमध्ये गावागावात पोचवताना त्यांना प्रचारात अवघे काही दिवस शिल्लक असताना समस्यांना सामोरे जात प्रचार करावा लागणार आहे दत्ता सामंत आता काय करिष्मा करतात याकडेसुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहेत मात्र मालवण तालुक्यामध्ये खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व मानून मोठ्या प्रमाणात स्वाभिमान पक्षाला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे अनेकांचे शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर होत आहेत दत्ता सामंत यांचा अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांच्या सोबत असणारे कार्यकर्ते देसाई यांना सहकार्य करण्यासाठी किती कटीबद्ध राहतात हेसुद्धा येत्या 24 ऑक्टोबरला मतमोजणीच्या वेळी स्पष्ट होणार आहे तूर्तास तरी या मतदारसंघात वैभव नाईक विरुद्ध रणजित देसाई अशीच दुरंगी लढत म्हणावी लागेल अन्य पक्षाचा याठिकाणी म्हणावा तेवढा प्रभाव पडणारा दिसत नाही.

 

10

4