मी…कोण हे जनताच दाखवून देईल…

2

सतिश सावंताचे राणेंना प्रत्युत्तर:कुणावर टीका नाही तर व्हीजन सांगणार…..

कणकवली, ता.०७: :

राणे विचारतात सतीश सावंत कोण? मात्र मी कोण आहे हे कणकवली मतदारसंघातील जनताच 21 ऑक्टोबरला दाखवून देईल असे प्रतिपादन सतीश सावंत यांनी आज येथे केले. पुढील 13 दिवसांतील प्रचारात मी कुणावर टीका करणार नाही. पण माझं व्हीजन काय ते सर्वांना सांगणार आहे. कारण जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही विकासाचं व्हीजन प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत पोचवलं आहे. आता विधानसभेत जाऊन इथले प्रश्‍न सोडवायचे आहेत असेही ते म्हणाले.
येथील शिवशक्ती मंगल कार्यालयात शिवसेनेचा मेळावा झाला. यात शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, गेले दोन दिवस मतदारसंघात फिरत आहे. यात कणकवलीसह देवगड आणि वैभववाडीमध्ये आपणाला जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ते पाहता आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याची खात्री पटली. तसेच आजच्या कार्यक्रमात अनेक गावचे सरपंच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी आपल्यावर विश्‍वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचा विश्‍वास आपण सार्थ ठरवणार असल्याचेही श्री.सावंत म्हणाले.

4

4