सतीश सावंत कणकवलीत इतिहास निर्माण करतील….

189
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विनायक राऊत : राणेंकडुन शिवसेना-भाजपा नेत्यावर झालेल्या टीकेला जनता उत्तर देईल…

कणकवली, ता.०७:

कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या साम्राज्याला सुरुंग लावला आणि नवीन इतिहास निर्माण केला. याच इतिहासाची पुनरावृत्ती कणकवली विधानसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळेल असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी आज कणकवलीत व्यक्त केला.
येथील लक्ष्मी विष्णू सभागृहात शिवसेनेचा आज मेळावा झाला. यात कणकवली मतदारसंघातील अनेक गावचे सरपंच, स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश करून भगवा हाती घेतला. खासदार विनायक राऊत यांनी या सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे उमेदवार सतीश सांवत, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटक नीलम पालव, बाळा भिसे, प्रथमेश सावंत, गीतेश कडू, अ‍ॅड.हर्षद गावडे, राजू शेटे, विलास साळसकर, रूची राऊत, नागेश परब आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.राऊत म्हणाले, मागच्या निवडणुकीत वैभव नाईक यांनी राणेंना चितपट करीत त्यांच्या साम्राज्याला तडाखा देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवला. आता तोच इतिहास कणकवली मतदारसंघात पुन्हा घडवायचा आहे. कालपर्यंत राणे सातत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धवजींवर टीका करत होते. एवढंच नव्हे तर संपूर्ण जग ज्यांचा आदर करत त्या पंतप्रधान मोदींवरही राणेंनी टीका केली होती. पण या सार्‍याची परतफेड आता कणकवलीतील जनता करणार आहे. शिवसेना मेळाव्यात संदेश पारकर, नीलम पालव, संजय पडते यांनीही मनोगत मांडले.

\