वैभववाडी, ता. ८ : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी तालुका भारतीय जनता पार्टीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात भाजपाचे नेते, नामदार विनोद तावडे यांची तोफ धडाडणार आहे. एडगांव येथील सुमित्रा मंगल कार्यालय या ठिकाणी हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, महायुतीचे उमेदवार नितेश राणे, भाजपा आमदार व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आ. अजित गोगटे, भाई सावंत, स्नेहा कुबल तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी दिली.
या मेळाव्याला तालुक्यातील भाजपाचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, विभागीय अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक, नगराध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.