कुंभारमाठ येथील अथर्व मंगल कार्यालयात आयोजन…
मालवण, ता. ८ : कुडाळ- मालवण विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचारार्थ उद्या ९ ऑक्टोबरला ठीक १० वाजता अथर्व मंगल कार्यालय, कुंभारमाठ येथे मालवण भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा होणार आहे.
या मेळाव्यास स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उमेदवार रणजित देसाई यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी भाजप आणि स्वाभिमान पक्षाचे सर्व आजी माजी प्रमुख पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष,आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी सरपंच, उपसरपंच, तालुक्यातील सर्व महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी, विद्यार्थी संघटना, तसेच तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमान तालुका अध्यक्ष अशोक तोडणकर, राजा गावडे, भाजप तालुका उपाध्यक्ष महेश मांजरेकर, शहराध्यक्ष बबलू राऊत यांनी केले आहे.