प्रमोद जठार: भाजपाचा परिस स्पर्श झाल्यामुळे राणेंचे सोने होईल
सावंतवाडी ; ता ‘८: राजन तेली अपक्ष असले तरी भाजप त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या प्रचारासाठी भाजपाचे नेते जिल्ह्यात येणार आहेत.त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. युती तोडण्याची सुरुवात शिवसेनेने कणकवलीतून झाली. शेवट आम्ही सावंतवाडीत करू असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज लगावला.
नाणार प्रकल्पाला समर्थन या एकमेव मुद्द्यावर राणेंना भाजपात संधी प्रवेश देण्यात आला.राणे भाजपात आले तर आमचा पक्ष वाढेल अशी भिती असलेल्या शिवसेनेच्या छुप्या राजकारणामुळे तब्बल दोन वर्ष हा प्रवेश रेंगाळला होता. परंतु आता जिल्ह्यातील भाजप वाढेल. राणे हे लोखंड आहे,आता भाजपाचा परिस स्पर्श झाल्यामुळे त्यांचे आता सोने होणार आहे. प्रमोद जठार आणि दोन दिवसात भाजपाचे उमेदवार नितीश राणे यांचा प्रचार करावा अन्यथा त्यांची हकालपट्टी करण्यात येईल त्यांना जायचे असेल तर त्यांनी खुशाल अन्य पक्षात जावे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांचे फोटो आपल्या प्रचारासाठी वापरू नये असेही त्यांनी सांगितले श्री जठार यांनी आज तेली यांच्या पक्ष कार्याला भेट दिली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावी तालुकाध्यक्ष महेश सारंग मंदार कल्याणकर आनंद नेवगी शितल राऊळ सिद्धार्थ भांबुरे आदी उपस्थित होते