माझी काळजी केसरकरांनी करू नये…

164
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राजन तेली:अपक्ष असलो तरी, कार्यकर्तेच माझी ताकद

सावंतवाडी ता ०८
मी अपक्ष असलो,माझे चिन्ह जरी नवखे असले,तरी माझ्या चिन्हाची काळजी केसरकरांनी करू नये. माझी ताकद माझे कार्यकर्ते आहेत त्यामुळे निश्चितच माझा विजय आहे.असा दावा माजी आमदार तथा भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांनी आज तळवणे येथे केला. परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने श्री तेली यांनी आज या ठिकाणी भेट दिली व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी काही झाले तरी आपण निवडून येणार आहे. आपण पराभूत होवू म्हणून केसरकरांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.त्यामुळे महायुतीचा उमेदवार मीच आहे असे सांगून लोकांना संभ्रमात ठेवण्याचे काम केसरकर करीत आहेत. मात्र अशा भावनिक आवाहनांना लोक बळी पडणार नाही असे तेली म्हणाले.
यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, नारायण कांबळी, सत्यवान राऊळ, स्वाभिमानचे शेखर गावकर, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\