रांगणा तुळसुलीचे उपसरपंच शिवसेनेत दाखल

179
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ.ता,०९: स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश घेऊन आमदार वैभव नाईक स्वाभिमान पक्षाला दरदिवशी धक्यावर धक्के देत आहेत. रांगणा तुळसुली ग्रा.पं.चे उपसरपंच संतोष वरक यांच्यासह ग्रा.पं.सदस्य व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
वेताळ बांबर्डे येथे शिवसेना विभागीय कार्यालयाचे उदघाटन सोमवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुडाळ शिवसेना महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी हा प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला.
रांगणा तुळसुलीचे सरपंच नागेश आईर यांनी नुकताच मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ सोमवारी उपसरपंच संतोष वरक, ग्रा.पं.सदस्य विलास चव्हाण, ज्ञानदेव घाटकर, रंजिता आईर, रिया तुळसुलकर यांच्यासह स्वाभिमानचे बुथ अध्यक्ष सुभाष तुळसुलकर, सुधाकर सावंत, धावू वरक, आकाश मांजरेकर, बाबी गोवेकर, बाळा राणे, बापू शिर्के, सुजाता शिर्के, आबा वारंग, प्रविण कदम आदींसह स्वाभिमानच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत भगवा झेंडा हाती घेतला. यामुळे आता रांगणा तुळसुली ग्रा.पं वर शिवसेनेची सत्ता आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांच्या हाती शिवबंधन बांधले.
यावेळी जि.प.गटनेते नागेंद्र परब, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ.श्रेया परब, महीला आघाडी तालुका प्रमुख सौ. स्नेहा दळवी, पं.स.सदस्या सौ.शीतल कल्याणकर, विभाग प्रमुख पपू पालव, उपविभाग प्रमुख मंगेश मर्गज, नरेंद्र राणे, साईनाथ खोत, अतुल बंगे, आनंद भोगले, सुशील चिंदरकर, राजू मुंज, विद्या मुंज, गुरू मुंज, संकेत सावंत, अमित कल्याणकर, आनंद मर्गज, सदानंद पाताडे, संदीप सावंत, शाखाप्रमुख रामदास मेस्त्री, सुहास तेरसे, विजय सावंत, सुनील सावंत, अमोल सावंत, विवेक कुपेरकर, बाळू घाडी, दिवाकर आईर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वेताळ बांबर्डे
येथे शिवसेना विभागीय कार्यालयाचे उदघाटन करताना स्नेहा दळवी आम वैभव नाईक नागेंद्र परब छाया अजय सावंत

\