ठाण्यात झाड अंगावरून कोसळून दोघे ठार…

2

ठाणे ता.०९:* येथे पुन्हा एकदा वृक्ष कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी रात्री ही घटना घडली.दरम्यान, रात्री झालेल्या वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ठाणे स्थानक परीसरात असलेले भले मोठे ताडाचे झाड मधोमध तुटून ठाणे एसटी बसस्थानकानजीक असलेल्या पत्र्याच्या शेडवर पडले.या दुर्घटनेत तेथील एक मोबाइल विक्रेता फेरीवाला आणि पावसामुळे आडोश्याला उभा असलेल्या युवकाला आपले प्राण गमवावे लागले.

यापूर्वी ठाण्यात झाड कोसळून दुचाकीवरील वकिलाचा मृत्यू आणि अन्य एका घटनेत व्यापारी जायबंदी झाला होता. त्यामूळे, पुन्हा एकदा ठाण्यातील वृक्षांच्या पडझडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट कमांक 2 नजीक कळवा दिशेकडील एसटी बस स्थानकालगतच्या गल्लीत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

दरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उंच ताडाचे झाड हलत होते, अचानक जोरात आवाज झाला व हे झाड मधोमध तुटून खाली कोसळले. जोरदार पाऊस व विजा चमकत असल्याने तेथे आडोश्याला उभा असणाऱ्या युवकावर हे झाड पडले. झाड थेट डोक्यात पडल्यामुळे अमन शेख (19) रा. कौसा, मुंब्रा याचा जागीच तर, रूपचंद जैसवाल (30) रा. गावदेवी, नौपाडा या गंभीर जखमी तरुणाचा बुधवारी पहाटे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुमारे 50 वर्षापूर्वीचे असणारे हे ताडाचे झाड अचानक तुटल्याने स्थानिक नागरीक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कारण अगदी मधोमध (जमिनीपासुन आठ ते दहा फुटावर )झाड कमकुवत झाल्याचे दिसत असुन तुटलेल्या झाडाच्या खोडामध्ये कापल्याच्या खुणा आढळल्याचे नागरीकांनी सांगीतले.बऱ्याच उशिराने घटनास्थळी ठाणे मनपा आपत्कालीन पथक व अग्निशमन दल पोहचुन बचावकार्य करण्यात आले.

10

4