दीपक केसरकर: राणेंना घाबरलो नाही,तर तेली काय चीज….
सावंतवाडी.ता,०९:
भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. राणेना मी घाबरलो नाही.तर राजन तेली काय चीज अशी टीका शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.
आडेली येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या प्रसंगी ते उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते म्हणाले जिल्ह्यात तीनही जागांवर उभे असलेले उमेदवार हे राणे समर्थक आहेत. त्यामुळे राणेंची प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी त्या तिघांनाही पराभवाचा घाट दाखवा असे आवाहन त्यांनी केले.श्री केसरकर केले.केसरकर यांनी प्रचार सभा घेतली यावेळी त्यांनी कार्यकर्ते व शिवसैनिकांशी संवाद साधला शिवसेना व भाजपा च्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास झाला. कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे.त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा विकासासाठी येथील जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे त्यांनी आवाहन केले.
काही झाले तरी अपक्ष उमेदवाराला जनता थारा देणार नाही.भाजपाचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्यामुळे माझा विषय निश्चित आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.