केसरकरांच्या प्रचारार्थ वेंगुर्लेत युवा सेनेचा १४ ला भव्य मेळावा…

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शिवसेनेचे फायर ब्रॅण्ड नेते नितीन नांदगावकर राहणार उपस्थित…

वेंगुर्ले : ता.८
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ युवा सेनेचा सावंतवाडी विधान सभेचा भव्य मेळावा सोमवार १४ ऑक्टोबर रोजी सायं.४.३० वाजता वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेनेचे फायर ब्रॅण्ड नेते नितीन नांदगावकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विजयासाठी युवा सेनेने कंबर कसली आहे. त्यात हा नांदगावकर यांच्या उपस्थिती मधील मेळावा असून त्यांची तोफ कोणावर धडकते ते पाहावे लागणार आहे. तरी युवकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना प्रमुख मंदार शिरसाट, वेंगुर्ले तालुका युवसेनाप्रमुख पंकज शिरसाठ व शहर युवासेना प्रमुख शेखर काणेकर यांनी केले आहे.

\